खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघातकी स्फोटात दोन पोलिसांचा मृत्यू   

पेशावर : पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी रात्री झालेल्या आत्मघाती स्फोटात एका उपनिरीक्षकासह दोन पोलिस ठार झाले. तर तीन जण जखमी झाले.पेशावरच्या चमकानी पोलिस ठाण्याअंतर्गत रिंग रोडवरील गुरांच्या बाजाराजवळ आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या मोबाईल व्हॅनवर हल्ला केला. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी शोक व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आहे.गंडापूर म्हणाले, लोकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षकांवर हल्ला करणे हे निंदनीय आणि भ्याड कृत्य आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोबल कमी होणार नाही.

Related Articles